
लखनवाडा मंदिरामध्ये नवरात्रोत्सव सुरू
बातमी थोडक्यात
श्रीक्षेत्र लखनवाडा निंबाई मालोकर येथील श्री जगदंबा माता मंदिरात घटस्थापनेला नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. एकाच माचडावर विराजमान असलेल्या श्री तुळजाभवानी माता व श्री रेणुका माता या दोन्ही देवतेच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक भाविक जमले होते. सुनील चताराकर यांच्या हस्ते विधीवेळी पवित्र साडी अर्पण करण्यात आली. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल.