
डॉ. जाधव यांनी तंत्रज्ञान केंद्रित पदवीधर विकासासाठी पुढाकार
बातमी थोडक्यात
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपा उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी पदवीधरांच्या विकासासाठी रोजगारोन्मुख प्रशिक्षण, उद्योग सहकार्य, महिला सक्षमीकरणावर भर देणारे नऊ ठराव मांडले. पदवीधरांसाठी एआय, डिजिटल मार्केटिंग या आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत त्यांनी तालुका स्तरावर करिअर मार्गदर्शन शिबिरे, रोजगार मेळावे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याचेही डॉ. जाधव यांनी ठराव मांडला.