
छत्रपती संभाजीनगर मध्ये लाच घेतल्याप्रकरणी वन अधिकाऱ्याला अटक
बातमी थोडक्यात
लाकडी वाहनावर कारवाई टाळण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कन्नड येथील वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी नागनाथ तोमपे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाकूड व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे कन्नड तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणे शुक्रवार रात्री उशिरापर्यंत सुरू होते.