
वाई जवळील सुंदरपेट येथे बिबट्याकडून गुरांवर हल्ला
बातमी थोडक्यात
वाई जवळील सुंदरपेट येथे बिबट्याने बैल व लाल बैल यावर हल्ला केला. या घटनेमुळे वाई शहराजवळील विराटनगर व सुंदरपेट येथील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याची उपस्थिती यशवंतनगर येथील दाट झाडी व बांधकामाशी जोडली जात असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून गस्त वाढविली आहे.