
बी. फार्मसी अभ्यासक्रम अंमलबजावणी कार्यशाळा आकुर्डी येथे संपन्न
बातमी थोडक्यात
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बी. फार्मसी अभ्यासक्रम अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक दिवसीय कार्यशाळा डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे संपन्न झाली. डॉ. विनायक जोशी यांनी अभिनव अध्यापन पद्धतीची गरज अधोरेखित केली, तर डॉ. राकेश सोमानी यांनी अभ्यासक्रम संरचनेवर मार्गदर्शन केले. डॉ. सतीश पोळशेट्टीवार यांनी फार्मसी शिक्षणात एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. या कार्यक्रमाला ७५ पेक्षा अधिक प्राध्यापकांनी हजेरी लावली.