
महाराष्ट्राची पाणीसंकटाच्या दिशेने वाटचाल
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याने महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये येत्या काही दिवसात टंचाई जाणवू शकते. तंत्रज्ञानाचा वापर करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना पारदर्शकता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.