
नांदेड : दुष्काळ निवारण कामे सुरू होणार
बातमी थोडक्यात
तालुक्यात दुष्काळ कायम असल्याने तलावातील गाळ काढून सिंचन क्षमता वाढविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. पिंपळधाव साठवण तलाव व सुधा प्रकल्प उंची वाढविण्याचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणार असून या कामासाठी ८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या उपायांमुळे रोजगार उपलब्ध होण्यासोबतच दुष्काळात शेतकरी व रहिवाशांना आधार मिळणार आहे.