
आयडीबीआय बँकेतील हिस्सा कॅनडा कॉर्पोरेशनला विकला
बातमी थोडक्यात
प्रेम वत्सा यांच्या फेअरफॅक्स फायनान्शिअलच्या पाठबळावर आयडीबीआय बँकेतील ६०. ७२ टक्के हिस्सा ५२ हजार ८७८ कोटी रुपयांना कॅनडा कॉर्पोरेशनला विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. भारतातील वित्तीय सेवा क्षेत्रातील ही सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक आहे. सार्वजनिक बँकेतील परदेशी मालकी आणि त्याचा कामकाज आणि भारतीय भागधारकांवर होणारा परिणाम याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.