
नागपुरात ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाडेकरू अटकेत
बातमी थोडक्यात
नागपुरात ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय राजेश कनोजिया या भाडेकरूला नागपुरातल्या पाचपावली परिसरातून अटक करण्यात आली. शाळेत जनजागृती करताना या मुलीने शिक्षिकेकडे या घटनेची माहिती दिली होती. अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या पालकांनी तक्रार दाखल केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.