
पोर्टल एकत्रीकरणामुळे शिक्षकांचे पगार रखडले
बातमी थोडक्यात
यू-डीआयईएस, शालार्थ आणि मान्यता पोर्टलच्या एकत्रीकरणामध्ये तांत्रिक अडचणी आल्याने राज्यभरातील शिक्षकांचे पगार रखडले आहेत. कार्यरत शिक्षक, मंजूर पदे आणि रिक्त जागांच्या आकडेवारीतील विसंगतीमुळे मोठ्या प्रमाणात विलंब होत असून, आंशिक अनुदान मिळणाऱ्या शाळांनाही फटका बसला आहे. शिक्षण विभागाने या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.