
दादा डोसा रेस्टॉरंटमधून १७ हजार ३३० रुपयांची चोरी
बातमी थोडक्यात
पुंडलिकनगर रोडवरील दादा डोसा रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन टोळीने घुसून १७ हजार ३३० रुपये व मोबाईल फोनची चोरी केली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा छडा लागला. दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून तिसऱ्याला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. २७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.