
राज्य सरकारने नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा निश्चित केली
बातमी थोडक्यात
शालेय शिक्षण विभागाने शालेय प्रवेशासाठी नवीन किमान वयोमर्यादा निश्चित केली आहे. बालवाडी किंवा नर्सरीसाठी तीन वर्षे, बालवाडी-2 किंवा ज्युनियर केजीसाठी चार वर्षे, बालवाडी-3 किंवा सीनियर केजीसाठी पाच वर्षे आणि पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे वय आवश्यक आहे. नवीन नियम 2027-28 मध्ये लागू होतील. 30 जून ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.