
स्वाधार योजनेसाठी वार्षिक अनुदान श्रेणीनिहाय १६ हजार रुपयांनी वाढविले
बातमी थोडक्यात
वसतिगृहाच्या जागेच्या कमतरतेमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानामध्ये श्रेणीनिहाय १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहतात, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडचणी येतात. अनुदानामध्ये वाढ केल्याने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मदत होईल.