
पुण्यातून पाणीपुरवठा ४० टक्क्यांनी कमी करणार
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे पुण्यातून होणारा पाणीपुरवठा ४० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने मांडला आहे. १६ ऑक्टोबर रोजी जलवितरणाचा निर्णय घेण्यासाठी कालवा समितीची बैठक होणार आहे. राज्य सरकारने १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात होत होती.