
सातारा : रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांच्या मनात शंका
बातमी थोडक्यात
रस्त्यावर पाणी असूनही केसरकर पेठ, करंजे, शनिवार पेठ, गोल मारुती मंदिर परिसर, सदर बाजार येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दररोज १५ ते १६ टँकर येऊन टँकरची प्रत्येक खेप नागरिकांना बाराशे रुपये देऊन मिळत असल्याने नगरपालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.