
सांगली पाणी कपात आजपासून १० टक्के कपात सुरू
बातमी थोडक्यात
सांगली महापालिकेने दुष्काळ आणि शासनाच्या निर्देशामुळे आजपासून आपल्या भागातील १० टक्के पाणी कपात सुरू केली आहे. सांगली, कुपवाड आणि मिरज शहरांतील टाक्यांना होणारा पाणीपुरवठा कमी केला जाणार असून, मिरज येथील सर्व १७ टाक्या दर मंगळवारी बंद केल्या जाणार आहेत. दररोज काढण्यात येणारे पाणी १.३० कोटी लिटरने कमी होणार आहे.