
बंधू २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
बातमी थोडक्यात
'बंधू' हा चित्रपट नियोजित वेळापत्रकानुसार २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्या शेतकरी कुटुंबावर आधारित नात्यांची एक हृदयस्पर्शी कथा आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी हे दोन भाऊ असून त्यांच्यासोबत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे यांच्या भूमिका आहेत. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संवाद लिहिले आहेत.