
नाशिक बस स्टँडवर आंतरराज्यीय चोरी टोळीचा सापळा
बातमी थोडक्यात
नाशिक बस स्टँडवर चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन संशयितांना गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून 24 लाख 43 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईत शहरातील दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाईवर देखरेख केली.