
फडणवीस यांचा दावा इलेक्ट्रिकद्वारे डॉलर २० रुपयांपर्यंत खाली येणार
बातमी थोडक्यात
५० टक्के वाहने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित केल्याने इंधनाचे आयात कमी होऊन डॉलर २० रुपयांपर्यंत खाली येईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या हस्ते तालेगाव येथे सुरू झालेल्या एनर्जी इन मोशन कंपनीच्या या प्रकल्पातून जेएनपीएला इलेक्ट्रिक ट्रक पुरवले जाणार असून ते मुंबई-पुणे महामार्गावर वापरण्याची योजना आहे. या गुंतवणुकीमुळे मावळ तालुक्यात थेट ४ हजार रोजगार निर्माण झाले आहेत.