
ऊस दराला ५५०० रुपये प्रति टन द्या, शेतकऱ्यांची मागणी
बातमी थोडक्यात
ऊस दराची घोषणा न करता साखर कारखान्यांचा हंगाम सुरू केल्याने साखर कारखाने बंद पाडण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलक मोठ्या कारखान्यांवर धडक देण्याच्या तयारीत असल्याने कारखान्यांच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कारखान्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.