
पत्रकार हरेश गजवाणी यांची उल्हासनगरमध्ये हत्या
बातमी थोडक्यात
उल्हासनगर रेल्वे स्थानकातील लालचक्की रोडवरील रिक्षा स्टँडजवळ गोळी झाडून पत्रकार हरेश गजवाणी यांची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री ही घटना घडली असून अविनाश नायडू यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.