
शॉर्ट सर्किटमुळे मंडरूपात ऊस जळाला
बातमी थोडक्यात
मंडरूपात व्होल्टेजच्या चढउतारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन एकर ऊस जाळला. शेतकऱ्यांनी विहीर आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे उर्वरित दोन एकर ऊस वाचला. या घटनेमुळे वीज मंडळावर आरोप होत असून चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तलाठी रावसाहेब कोकरे यांनी सरकारला चौकशी अहवाल सादर केला आहे.