
श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील खोखो संघाला तालुकास्तरीय अजिंक्यपद
बातमी थोडक्यात
श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील खोखो संघाने मॉडर्न हायस्कूल, भोसले येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व खेडे तालुका क्रीडा संघ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत शाळेच्या क्रीडा लौकिकात भर पडली. आता या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, खेळाडूंचे अभिनंदन अजित वडगावकर यांनी केले.