
मोहोळ मध्ये तंबाखू जप्त
बातमी थोडक्यात
मोहोळ शहरातील मांडवे वस्तीत मंगळवारी ४ लाख ६४ हजार रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला. यात १ हजार १६० पाकिटांचा समावेश होता. यात ५६० पाकिटांमध्ये ३३२० गुदकूची चव असलेल्या तंबाखूचा समावेश होता. सुधाकर प्रभू मांडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तंबाखू विक्री करणाऱ्या मोहोळ शहरातील नागरिकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.