
14 किलो गांजा उल्हासनगर मध्ये जप्त
बातमी थोडक्यात
उद्योग विहार मध्ये दोन व्यक्ती गांजा विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी उल्हासनगर मध्ये 14 किलो गांजा जप्त केला. उत्तर प्रदेशातील दोन तस्करांना अटक करण्यात आली असून मोबाईल फोनसह 8 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.