
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त ३४ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी आकारली जाणार नाही, असे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळणकर यांनी दिले आहेत. शैक्षणिक संस्थांना फी माफी देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी केंद्रीय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मदतीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाशी संपर्क साधावा.