
रिक्षा वादातून त्र्यंबक नाका येथे तरुणावर हल्ला
बातमी थोडक्यात
त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात रिक्षा भरण्याच्या वादातून प्रेम हिरे यांच्यावर दगड आणि पेव्हर ब्लॉकने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. गुंडविरोधी पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले असून प्रेम यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.