
पुणे-बंगळुरू महामार्ग शेतकऱ्यांच्या रोकोमुळे; पोलिसांकडून सूचना
बातमी थोडक्यात
कोगोळी येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला. स्वाभिमानी शेतकरी संघटना व रायत संघाच्या नेतृत्वाखाली साखर व उसाच्या दरात वाढ करण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. प्रवाशांनी महामार्ग टाळावा व पर्यायी मार्ग वापरावा, असा सल्ला देण्यात आला आहे.