
आमदार इद्रिस नायकवाडी यांना जीवे मारण्याची धमकी
बातमी थोडक्यात
समान नागरी कायद्याला विरोध केल्यामुळे आमदार इद्रिस नायकवाडी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी नायकवाडी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात दखल न घेण्याजोगे गुन्हे दाखल केले.