
अंबाबाई मंदिराचे अडथळे हटविले
बातमी थोडक्यात
हिंदू जनसंघर्ष समितीच्या मागणीनंतर मंगळवारी अंबाबाई मंदिराच्या भोवतीचे अडथळे पोलिसांनी हटविले. दोन दिवस अडथळ्यांमुळे भाविकांना प्रदक्षिणा मार्गावर ये-जा करता आली नाही. अडथळे हटविल्याने भाविक व पुजारी विनाअडथळा धार्मिक विधी करू शकले.