
महाराष्ट्रातील दुष्काळात शाही दसरा साध्या पद्धतीने साजरा करणार
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे शाही विजयादशमी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याची घोषणा खु. उदयनराजे भोसले यांनी केली. पावसाने साथ न दिल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, ३०० हून अधिक तालुक्यांवर दुष्काळाचा परिणाम झाला आहे. नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा आणि दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.