
अनधिकृत बांधकाम विक्रीवर राज्याची बंदी
बातमी थोडक्यात
आर्थिक फसवणुकीच्या सार्वजनिक तक्रारीनंतर राज्य सरकारने अनधिकृत बांधकाम व्यवहारांच्या नोंदणीवर बंदी घातली आहे. राज्यातील अनधिकृत बांधकाम प्रकल्पांमुळे सदनिकांच्या आकाराबाबत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याने हस्तक्षेप करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनधिकृत इमारतींमध्ये विक्री खरेदीवर बंदी घालण्याचे आदेश दिले असून, दुय्यम निबंधकांना कडक इशारा दिला आहे.