
संभाजीनगरचा आर्थिक उदय
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील एक मोठे आर्थिक महाकेंद्र म्हणून उदयास येत असून, २०२४-२५ मध्ये येथील जी.एस.डी.पी. १,३३,१०५ कोटी रुपये इतका आहे. जिल्ह्यातून होणारी निर्यात ३१,००० कोटी रुपयांवर गेली असून, २०२५-२६ मध्ये सी.जी.एस.टी. संकलन ४,३१९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जिल्ह्यातील आर्थिक उदयामुळे उद्योगांना चालना मिळेल, रोजगाराची वाढ होईल आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. पायाभूत सुविधांचे प्रकल्प जलद गतीने राबविले जाणे आणि त्यासाठी पुरेसा निधी मिळणे आवश्यक आहे.