
चप्पलगाव : नवरात्र काळात 'घटा' साठी घरपोच धान्य वाटप माजी सरपंच यांच्या हस्ते सुरू
बातमी थोडक्यात
चप्पलगाव व बावकरवाडी येथे नवरात्र काळात 'घटा' साठी घरपोच धान्य वाटप माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या हस्ते सुरू झाले. 'जपते सेवा कार्य' या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात धार्मिक परंपरा जपून सामान्य कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्वयं-सहायता गटातील महिला, विद्यार्थी व युवक यांनी सहकार्य केले. महिलांचे श्रम वाचून सर्वांना सोयीस्कर होईल, अशी ही सेवा होती. धार्मिक परंपरा जपण्याच्या सामाजिक बांधिलकीचा या सेवेतून प्रत्यय आला.