
खटाव तालुक्यातील ऊस वाहतूक ठप्प
बातमी थोडक्यात
ऊस परिषदेच्या बैठकीत योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अनिल पवार, दत्तुकाका घारगे यांच्या नेतृत्वाखाली खटाव तालुक्यातील ऊस वाहतूक ठप्प झाली. काही भागांत ऊस तोडणी व वाहतूक विस्कळीत झाली असून मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वाहतूकदारांना देण्यात आला आहे. ऊसाच्या दराचा प्रश्न सुटेपर्यंत कारखानात ऊस पाठवू नये, अशी संघटनेची मागणी आहे.