
तिसऱ्या यादीत १३४२ शेतकऱ्यांना कर्जमाफी
बातमी थोडक्यात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर झाली असून, जिल्ह्यातील 1342 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. या योजनेतून जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँकांचे 32 हजार 172 शेतकऱ्यांना 123 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जमाफी मिळाली आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करावी.