
ऐरोलीत १ कोटी ३० लाख रुपयांचा अवैध दारूची जप्ती
बातमी थोडक्यात
बेलापूर-ठाणे मार्गावरील ट्रकमध्ये ४८ हजार बाटल्यांसह १ कोटी ३० लाख ६० हजार रुपयांचा अवैध दारूचा साठा ऐरोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. जप्त केलेल्या मालामध्ये १८० मिली रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचा साठा होता. या साठ्यामध्ये बाटल्यांवर बॅच नंबर आणि किंमत नमूद केलेली नव्हती. या प्रकरणी जावेद खान नवाब खान पिंजारी (वय २४) याला अटक करण्यात आली आहे.