
मालतपूर आरोग्य केंद्राची कामे ठप्प; उपोषणाचा इशारा
बातमी थोडक्यात
दसऱ्यापर्यंत मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची जमीन ताबा आणि मोजणीची कामे मार्गी न लागल्यास उपोषणाचा इशारा रोहित वडकर यांनी दिला आहे. वाई तालुक्यातील पश्चिम भागातील हे आरोग्य केंद्र सध्या गावाच्या चौकात दोन खोल्यांमध्ये सुरू आहे. सर्वे क्र. ८७/३५ मधील जमिनीच्या मोजणीसाठी आरोग्य विभागाने ३ जुलै रोजी पत्र पाठवले आहे.