
मराठवाड्यातील २.०६ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीत कर्जमाफी
बातमी थोडक्यात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १२ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी शासनाने जाहीर केली. तिसऱ्या यादीत मराठवाड्यातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील ५१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच कर्जमाफीचा लाभ जमा होणार आहे.