
दुष्काळामुळे सोलापूरच्या सोयाबीन उत्पादनात ८७. ४ टक्क्यांची घट
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे सोलापूरच्या सोयाबीन उत्पादनात ८७. ४ टक्क्यांची घट झाली असून, खरीप पिकांपैकी मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त ठरले असून, ११० पैकी ९९ महसूल मंडळांना दुष्काळ पडला आहे. पीक नुकसानीचे अंदाज जवळपास पूर्ण झाले असून, आज सरकारला संपूर्ण अहवाल सादर करण्यात येणार आहे.