
नवीन टाक्या जोडण्यासाठी २४ तास पाणीपुरवठा खंडित
बातमी थोडक्यात
नवीन साठवण टाक्या जोडण्यासाठी महापालिकेच्या १११८ मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा सोमवार सकाळी ८ ते मंगळवार सकाळी ८ पर्यंत बंद राहणार आहे. या बंदमुळे शिवाजीनगर, सिडको एन-५ आदी भागांवर परिणाम होणार आहे. आमेरनगरसह अन्य ठिकाणी नवीन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे व जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.