
शेगाव आणि भोसले येथे कामाच्या ताणामुळे दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
एका आठवड्यात कामाच्या ताणामुळे दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव येथील आरोग्य सहाय्यकाने आत्महत्या केली तर प्राथमिक आरोग्य केंद्र भोसले येथील आरोग्य कर्मचाऱ्याने प्राण सोडले. कामाचा अति ताण या कारणाने हे प्रकार घडले असा आरोप आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केला. सततच्या प्रशासकीय पाठपुराव्यामुळे आणि कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड ताण येतो. दोन्ही घटनांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.