
अभयनगर : दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
अभयनगर येथे रिक्षा थांब्याजवळ दुचाकीने धडक दिल्याने ७१ वर्षीय यशवंत बाबुराव शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दुचाकी चालक चिदानंद श्रीशैल चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.