
गोकुळ निवडणूक : गोकुळ संपविण्याची महायुतीची योजना
बातमी थोडक्यात
गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर झाली असून गोकुळ संपविण्याचा महायुतीचा अजेंडा असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. महायुतीतील अंतर्गत कलह आणि कारवायांचा कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. गोकुळ वाचविण्याची शेवटची संधी म्हणजे समविचारी उमेदवारांना विजयी करणे.