
तुळजाभवानी नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये घटस्थापनेने सुरू
बातमी थोडक्यात
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव रविवारच्या घटस्थापनेने सुरू झाला. कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते घटस्थापना झाली. 'आई राजा उडो उडो' या जयघोषात घटकलांची मिरवणूक निघाली. मुख्य मूर्तीची स्थापना झाली. भोपे पुजारी विनोद सुनील सोनजी यांच्या हस्ते देवीची पूजा झाली.