
सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ
बातमी थोडक्यात
हजारो भाविकांच्या दर्शनासाठी अद्या स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. सण आणि रविवारच्या सुट्टीमुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या निमित्ताने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पूजा व विधी करून दर्शनाचे औचित्य साधले.