
राहता मार्केटमध्ये कांदा ४२०० रुपये क्विंटलला
बातमी थोडक्यात
राहता मार्केट समितीमध्ये कांदा रविवारी ४२०० रुपये क्विंटलला पोहोचला असून १ नंबर कांदा ३१०० ते ४२०० रुपये दराने विकला जात आहे. मार्केटमध्ये त्याच दिवशी २०९१ बॅग कांदा आला असून डाळिंबाचा आवक ४२२७ क्रेट्सचा झाला आहे तर संत्री, सीताफळ यासारखी फळे कमी प्रमाणात आली आहेत.