
डॉक्टर रुग्णालयाच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत
बातमी थोडक्यात
डॉक्टर शिवचरण पाटील हे शनिवारी रुग्णालयाच्या वॉर्डमधून बेपत्ता झाले होते. बाथरूममधून मोबाईलचा आवाज आल्याने सहकाऱ्याला संशय आला. पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा उघडला असता शिवचरण पाटील यांचा मृतदेह हातात IV लाईन लावलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्यांच्या हातात दोन भूल देणारी औषधेही होत्या.