
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्टेट बँकांनी कर्जाची पुनर्रचना केली
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाची पुनर्रचना केली. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज पुनर्रचना आणि नवीन कर्ज याद्वारे आर्थिक दिलासा मिळणार आहे. सर्व सदस्य बँकांना कर्ज पुनर्रचना आणि नवीन कर्ज तरतुदीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.