
११ ऑक्टोबरपासून तुळजा भवानी मंदिरात नवरात्रोत्सव सुरू
बातमी थोडक्यात
विरहित येथील श्री तुळजा भवानी संस्थान येथे ११ ऑक्टोबर २०२६ पासून घटस्थापना व देवी भागवत ज्ञान यज्ञ या सोहळ्याने नवरात्रोत्सव सुरू होत आहे. १८ ऑक्टोबर रोजी संगीत सुंदराकांड पठण, तर २० ऑक्टोबर रोजी काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. काजळेश्वर, कांजरा आदी परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.